जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा साठ वर्षांच्या वृद्धाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वृद्धाविरोधात बुधवार १६ नोव्हेंबर रोजी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तवास आहे. याच परिसरात साठ वर्षीय वृद्ध राहतो. 14 नोव्हेंबर रोजी डोळ्यात औषध टाकण्याचा बहाणा करत वृद्धाने अल्पवयीन मुलीला त्याच्या घरी बोलवले. यादरम्यान वृद्धाने अल्पवयीन मुली सोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. दोन दिवसानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी अल्पवयीन मुलीच्या आईने नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित वृद्धाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.