नागपूर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने नागपूर येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात पाहर पडले.
या अधिवेशनाला उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधीत केले. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दरेकर, व्हीडीएनएचे श्रीकृष्ण चांडक, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष हरिचंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार आदी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांचे जीवन संघर्षमय असून त्यांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकार पाठपुरावा करेल, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांची महामंडळाची मागणी योग्य असून यासंदर्भात पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.