*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी*| तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपली थकबाकी तातडीने भरणा करावी यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन आज सकाळी करण्यात आले. मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हि रॅली काढण्यात आली.
तालुकासह शहरातील थकबाकीदार वीज ग्राहकांनी वाईट बिलाची भरणा करावी यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी बाईक रॅली शहरात काढण्यात आली. सदर रॅली शहरातील चौधरी वाडा येथून प्रारंभ करून हुडको कॉलणी, घाट रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवारवाडी, स्टेशन रोड, धुळे रस्ता व मालेगाव रस्ता आदी भागातून काढण्यात आली. दरम्यान ह्या रॅलीला ग्राहकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हि रॅली २६ मार्च रोजी सकाळी ८:१५ ते ९:१५ वाजताच्या सुमारास काढण्यात आली होती. याची सांगता शहरातील कक्ष-२ येथील सर्व कर्मचाऱ्यांना वीज बिल जमाबाबत संबोधित करून करण्यात आली.
यावेळी मुख्ख कार्यकारी अभियंता शेंडगे, शहर उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता भेले, अभि. वर्मा, अभि. चव्हाण, अभि. नंदनवार, उपव्यवस्थापक अकोट, सोनवणे, राठोड, विभागीय कार्यालयातील कर्मचारी, उपकेंद्र, चालक ठाकूर, गायकवाड व वीज ग्राहक उपस्थित होते.