वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यासह त्यांच्या कर्मचाऱ्याला थकित वीजबिल धारकाकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, दिक्षीतवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता जयेश जनीकांत तिवारी यांच्यासह कार्यालयीन सहाय्यक योगेश शेषराव जाधव, तंत्रज्ञ नमो मधुकार सोनकांबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे यांनी गुरूवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर परिसरात थकीत वीजबिल धारकांना विज बिल भरण्याबाबत सुचना करण्यासाठी दुपारी दीडवाजता गेले. त्यावेळी सिंधी कॉलनी येथील वीज ग्राहक टिकमदास परमानंद पोपटानी रा. सिंधी कॉलनी याने ७५ दिवसांपासून विजबिल भरलेले नव्हते. सहाय्यक अभियंता जयेश तिवारी यांनी थकीत विजबील भरण्यासाठी सांगितले. याचा राग आल्याने ग्राहक टिकमदास पोपटानी याने शिवीगाळ करून दमदाटी केली तर सोबत असलेल्या कर्मचाऱ्याशी अरेरावी करून झटापटी करून मारहाण केली. याप्रकरणी सहाय्यक अभियंता तिवारी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी टिकमराव पोपटानी याच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद फणसे करीत आहे.

Protected Content