Home Cities अमळनेर विहिरीत पाय घसरून पडल्याने लोण पंचम येथील प्रौढाचा मृत्यू

विहिरीत पाय घसरून पडल्याने लोण पंचम येथील प्रौढाचा मृत्यू


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील लोण पंचम येथील यांचा 25 रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील लोण पंचम येथील रहिवाशी नारायण यशवंत पाटील (वय 55) हे 25 रोजी सकाळी विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणायला गेले. बराच वेळ झाला परत आले नाही. योगीराज न्हावी यांनी त्यांच्या कुटुंबाला कळवले की, नारायण पाटील हे गावाबाहेरील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर पाय घसरून पडले. गावातील अनिल पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीत उतरून नारायण पाटील यांचे मृतदेह बाहेर काढले. विनोद पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपस रोहिदास जाधव व सचिन निकम करीत आहेत.


Protected Content

Play sound