Home Cities यावल विहिरीतून दोन विद्यूत पंपांची चोरी

विहिरीतून दोन विद्यूत पंपांची चोरी


यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी दोन विद्यूत पंपाची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस सतिष यावलकर (वय-४०) रा.वाणी गल्ली, यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे यावल शहरापासून जवळ भालशीव रस्त्यावर शेत आहे. ३ मे रोजी सायंकाळी ६.३० ते ४ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीत असलेली दोन ईलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तेजस यावलकर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound