बोदवड, प्रतिनिधी । बोदवड शहरातील रस्त्याचे काम सुरु असून या मार्गावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याची नव्याने उभारणी करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी (आठवले) गटाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बोदवड शहरातील जामनेर रोडवरिल रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने पुतळ्याचे सुशोभीकरणाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेवून भविष्यात पुतळ्याची विटंबना होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे भविष्यात असला अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित रोड ठेकेदार, प्रशासन प्रमुख म्हणून तहसील व रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कामाची रुपरेषा आखावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे वतीने व्यक्त करण्यात आली होती. मात्र असं न झाल्याने परिणाम आज दि.१४ रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिक १२:३० वाजता रिपब्लिकन पार्टीचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करून तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जोपर्यंत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांना सन्मानपूर्वक संबंधित ठेकेदार, तहसीलदार यांची बैठक घेऊन पुढील कामाची रुपरेषा आखाली जात नाही तोपर्यंत रस्त्याचे काम आम्ही होवू देणार नाही असा पवित्रा रिपब्लिकन पार्टी(आठवले) घेतला आहे. तरी येत्या आठ दिवसांत याबाबत सविस्तर चर्चा होऊन मार्ग न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासनाला निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी (आठवले)गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष संजय तायडे, तालुका युवाध्यक्ष सदानंद वाघ, राजू इंगळे, युवराज तायडे, गौतम निकम, ईश्वर तायडे, सुरेश तायडे, रुपेश मेढे, नितीन सुरवाडे, विश्वास बोदडे, सुनील बोदडे, शेख मुसा शेख इसा, प्रभाकर वाघ, शेख लुकमान आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/339429951208605