विश्वकर्मा मंदीराची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील कवनुर येथील विश्वकर्मा समाज मंदीराचे मोडतोड समाजकंठकाडून करण्यात आली. संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पाचोरा येथील विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी नजीक असलेल्या कवनुर येथील सुतार गल्लीतील श्री. विश्वकर्मा समाजाये श्री. विश्वकर्मा समाज मंदिराची २३ जुलै रोजी रात्री १:३० वाजेच्या सुमारास काही समाज कंटक लोकांच्या समुहाने एकजुट होवुन सुतार गल्लीमध्ये दहशत माजवत येथे असणाऱ्‍या समाज मंदिराची मोडतोड करत प्रचंड नुकसान केले आहे. या लोकांवर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. विश्वकर्मा समाज मंदिर ही आमच्या समाजाची अस्मिता आहे. याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्र भर उमटू शकतात. मंदर लोकांवर तकार केली म्हणून व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. येथील आमच्या समाज बांधवांच्या जिवीतास धोका आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून आरोपीवर कडक कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

 

अशा आषयाचे निवेदन  ४ ऑगस्ट रोजी तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. सदरचे निवेदन निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी स्विकारले. निवेदन देते प्रसंगी श्री. विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था पाचोरा तालुकाध्यक्ष भगवान मिस्तरी, उपाध्यक्ष नाना मिस्तरी, सचिव मनोज मिस्तरीसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जळगांव व पोलिस निरीक्षक, पाचोरा यांना देण्यात आल्या आहेत.

Protected Content