जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर भागात राहणाऱ्या एका विवाहितेचा माहेरकडून २ लाख रुपये आण, या मागणीसाठी छळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन पतीसह एकूण १० जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर भागात निखत शोएब पठाण (वय-२१) या विवाहिता आपल्या पती व इतर नातेवाईकांसोबत वास्तव्याला आहे. या महिलेचे शोएब खान पठाण यांच्याशी २०२० मध्ये लग्न झाले होते. मात्र, लग्न झाल्यापासूनच संबधित विवाहितेकडे माहेरून २ लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती. यामुळे या विवाहितेला सासऱच्या मंडळीकडून शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ केला जात होता. अनेक दिवसांपासून हा छळ सुरु असल्याने, विवाहितेने या छळाला कंटाळून बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या विवाहितेच्या तक्रारीवरून पती शोएब रफिक पठाण, सासू अरमान रफिक पठाण, चुलत सासू अफसाना पठाण, चुलत सासरे अयुब पठाण, जेठ वसीम पठाण, नंनद, दिर, नंदोईसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास मिलींद सोनवणे हे करत आहेत