पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बु” येथील माहेरवाशिणीचा मालेगाव येथे सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बु” येथील कविता हिचा विवाह मालेगाव येथील कृष्णा रायाजी मोती यांचेशी ४ मे २०१७ रोजी अंतुर्ली बु” ता. पाचोरा येथे झाला होता. लग्नानंतर दोन वर्ष चांगली वागणूक मिळाल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणावरून कविता हिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. दरम्यान सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविता ही माहेरी निघुन आली होती. मात्र पती कृष्णा मोती यांनी अंतुर्ली येथे येऊन तसेच नातेवाईकांनी मध्यस्थी करत कविता ही सासरी नांदायला गेली होती. परंतु काही दिवसानंतर कविता हिचा पुन्हा शारिरीक व मानसिक छळ सुरू झाल्याने अखेर वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविता हिने कृष्णा रायाजी मोती (पती), रायाजी मोहन मोती (सासरे), निलाबाई रायाजी मोती (सासु) व गजानन रायाजी मोती (दिर) सर्व रा. कलेक्टर पट्टा, मालेगाव, जि. नाशिक या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहे.