विवाहितेचा विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील अट्रावल येथे एका विवाहीतेचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच उपचार केल्याने तिचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

 

या संदर्थात मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील अट्रावल येथे राहणाऱ्या एका २८ वर्षीय विवाहीत महिलेने ५ एप्रील रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरात संतापाच्या भरात खोकळ्याची औषद्य घेत आहे, असे घरातील मंडळीला सांगुन विषारी औषध घेवून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.  विषारी औषध घेतल्याने तिला अत्यवस्थ वाटू लागले त्यानंतर उलटी केली. ही प्रकार सासु आणी दिर यांच्या लक्षा आल्याने त्यांनी तातडीने रिक्शाद्वारे तात्काळ त्या महिलेस उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मोहीनी बारेला व त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी वेळीच दक्षता घेत उपचार केल्याने सदर महिलेस जिवदान मिळाले आहे.

 

याबाबत यावल पोलीस ठाण्यातील पोलीसांनी सदरच्या आत्महत्या करू पाहणाऱ्या त्या विवाहीत महिलेचा पोलीसांनी जबाब नोंदविला आहे . संतापाच्या भरात आत्महत्या करणाऱ्या महिलेस एक मुलगी व एक मुलगा असे दोन बाळ आहेत. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात महीलेवर उपचार सुरू असुन आता तिची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे वृत वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाले आहे .

Protected Content