जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला काहीही कारण नसतांना टोचून बोलून शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ८ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या नजरीन अशपाक पिंजारी (वय-२०) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील आसोदी येथील अशपाक युनूस पिंजारी यांच्याशी जुलै २०२१ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसातच पतीकडून विवाहितेला काहीही कारण नसतांना टोचून बोलणे सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. शिवाय सासू, सासरे, जेठ, आते सासू यांनी देखील गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी सुप्रिम कॉलनीत निघून आल्या. रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती अशपाक युनूस पिंजारी, सासरे युनूस इसामू पिंजारी, सासू परविनबी युनूस पिंजारी, जेठ शहरूख युनूस पिंजारी आणि आते सासू जमिलाबी ईसाक पिंजारी सर्व रा. आसोदा ता. जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.