विवाहबाह्य संबंधात अडसर ; प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

नागपूर (वृत्तसंस्था) विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये उघडकीस आली आहे.

 

राजू उरकुडे, पत्नी शुभांगी आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा असे तिघे नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत शासकीय वसाहतीतील भीमनगर येथे राहायला होते. याच ठिकाणी रुपेश बिहारा या तरुणासोबत शुभांगीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण राजू यांना लागली. त्यामुळे त्यांनी वसाहत सोडून भाड्याने खोली घेऊन राहायला सुरुवात केली होती. परंतू नवीन ठिकाणी जाऊनही तोच प्रकार सुरु असल्याने राजू आणि शुभांगी यांच्यामध्ये वाद वाढला. अखेर काल रात्री दोन वाजताच्या सुमारास आरोपी शुभांगीने आपला प्रियकर रुपेश आणि त्याचा चुलत भाऊ हरिशचंद्र यांना बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी राजूचे हात-पाय बांधले आणि उशीच्या मदतीने त्याची तोंड दाबून हत्या केली. याप्रकरणी महिलेसह प्रियकर आणि याच्या भावाला पोलिसांनी अटक केली.

Protected Content