जळगाव प्रतिनिधी । शहरातील महाबळ परिसरातील विकास कॉलनी येथील विवाहितेला तिच्या पतीसह जेठाने हाताने गळा दाबून तसेच उशीने तोंड दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पतीसह जेठावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पती योगेश छगन जोशी व जेठ प्रदिप जगन जोशी रा. जोशी कॉलनी असे दोघांची नावे आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वाती यांचे 10 फेब्रुवारी 2019 मध्ये तहसील कार्यालयात रेशन विभागात इंजिनिअर म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नोकरीला असलेल्या योगेश जोशी यांच्याशी विवाहि झाला. लग्नानंतर स्वाती यांच्याबद्दल त्यांचे पती यांना जेठ उलट सुलट सांगून वाद निर्माण करत होते. याबाबत स्वाती यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. नेहमीच्या वादामुळे जून 2020 पासून योगेश जोशी व पत्नी स्वाती हे दोन्ही महाबळ परिसरातील विकास कॉलनी येथे भाडे करारावर खोली घेवून वास्तव्यास आहेत.
8 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास योगेश जोशी यांनी पत्नी स्वातीच्या मोबाईलमध्ये स्वातीचे मित्रासोबत असलेले फोटो बघितले. यावरुन त्यांनी शिवीगाळ करत स्वातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हाताने गळा दाबला, गळा दाबल्याने स्वाती काही मिनिटांसाठी बेशुध्द पडल्या. ज्यावेळेच स्वाती शुध्दीवर आल्या त्यावेळी त्यांना तोडावर उशी पडलेली दिसली. यानंतर स्वाती शेजारी एका घरात गेली. याठिकाणी दरवाजा बंद केला. माद्ध याठिकाणी तिचे पती योगेश जोशी व प्रदीप जोशी आले. ते दोन्ही स्वातीला उचलून घेवून जात होते, मात्र यावेळी स्वातीने पती व जेठ मला मारुन टाकतील अशी, मला दवाखान्यात घेवून चला अशी आरडाओरड केली.
घरातील महिलेच्या मोबाईलवरुन स्वातीने तिच्या जोशी कॉलनीतील मावशीला संपर्क साधून सदर प्रकाराबाबत कळविले. त्यानुसार स्वातीचे मामा माणिक जोशी यांनी इतरांच्या मदतीने स्वातीला चिन्मय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी पोलीस जबाब घेण्यासाठी आले मात्र स्वाती जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याने जबाब न घेता पोलीस परतले. उपचारानंतर स्वाती दोन दिस तिचे नवीन जोशी कॉलनी येथील आजीकडे राहली. त्यानंतर मनस्थिती तसेच प्रकृती ठिक झाल्यावर तीने तक्रारीसाठी 11 डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी स्वाती हिच्या फिर्यादीवरुन पती योगेश जोशी व जेठ प्रदीप जोशी या दोघांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.