Home आरोग्य विवरे बु॥ येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

विवरे बु॥ येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई


रावेर प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी शासनाने संचारबंदी घोषीत केली आहे. या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या टारगट मुलांना व नागरीकांवर तसेच बाजार चौकात भाजीपाला विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांनी संध्याकाळी कारवाई केली.

यामुळे रस्त्यावर फिरणारे रिकाम टेकडे घरात बंदीस्त झाल्याने संचारबंदी झाली. रस्त्यावर फिरणारे नागरिक ऐकत नसल्यामुळे बाजार चौकात लाठी चार्ज करण्यात आला. विवरे बु॥ गावातील बाजार चौक व बसस्थानकावर फिरणाऱ्या व भाजीपाला विकणाऱ्यांना निंभोरा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यामुळे नागरीकांनी बेकायदेशिर घरा बाहेर पडल्यास चोप दिला जाणार आहे.


Protected Content

Play sound