पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दि. ४ डिसेंबर रोजी जळगांव येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवन येथे जि. प. केंद्र शाळा कुऱ्हाड खु” ता. पाचोरा येथील आदर्श शिक्षक विलास भास्कर पाटील यांना २०२२ ह्या वर्षाचा प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून जिल्हास्तरीय महात्मा जोतीराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. तर अध्यक्षस्थानी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणधिकारी ए. आर. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण ३३ पुरस्कारार्थी आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी विजय पवार (जळगांव), जे. डी. पाटील (एरंडोल) होते. मान्यवरांच्या हस्ते विलास पाटील यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी शिक्षकांच्या समस्येबाबत प्रोटॉन संघटना कायम सोबत राहील असे मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथील अल्पबचत भवन येथे विलास पाटील यांची शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद जळगावचे उपशिक्षणाधिकारी ए. आर. शेख, एरंडोल येथील शिक्षण विस्तार अधिकारी जे. डी. पाटील, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष मुबारक शहा, कोषाध्यक्ष मिलींद निकम, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विलास पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी आजचा हा जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. हीच माझ्या सामाजिक – शैक्षणिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन विलास पाटील यांनी केले. याप्रसंगी पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्षेत्रातील मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुबारक शहा यांनी तर उपस्थितांचे आभार यशराज निकम यांनी मानले. अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीतेसाठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.