विरवाडे येथे शिक्षकांनी उभारली टॉय लायब्ररी

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील विरवाडे  येथील जिल्हा परिषद शाळेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे तो म्हणजे “टॉय लायब्ररी “.  सर्व शाळांमध्ये ग्रंथालय असते परंतु या शाळेने टॉय लायब्ररी   उभारून विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेला व बौद्धिकतेची जोड दिली आहे.

 

कोणतेही शिक्षण हे मुलांना खेळता खेळता मिळाले पाहिजे.  मुले खेळता खेळता जितके शिकू शकतात तितके ते कशातूनही शिकू शकत नाही हा उद्देश डोळ्या समोर ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरवाडे येथे टॉय लायब्ररीचे उभारण्यात आली आहे. आज  प्रेरणा सभेच्या निमित्ताने या अनोख्या टॉय लायब्ररीचे उद्घाटन मा. सभापती आत्माराम माळके  व गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबा भिल , मुख्याध्यापक अकबर तडवी,   केंद्रप्रमुख अजित पाटील, केंद्रप्रमुख भरत शिरसाठ , मा.जि प सदस्य डॉ. धर्मेन्द्रसिंग राजपूत , चंद्रकांत पाटील, अनिता पाटील, संगीता भालेराव, मनीषा पाटील, अनिकेत पाटील, नंदलाल चौधरी, मुख्याध्यापक  एल. एच. पाटील समस्त पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content