चाळीसगाव: प्रतिनिधी । शहरात काही दिवसांपासून कोरोनाने कहर पुन्हा माजवायला सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे विना मास्क फिरणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईत पन्नास हजारां रुपयांहून अधिक महसूल नगरपालिकेला अद्यापपर्यंत प्राप्त झाले आहे. शहरात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. किंबहुना दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी आता कंबर कसली आहे. विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. अद्यापपर्यंत दिडशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
आज सकाळी १२ ते १ दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत चार हजारांहून अधिक वसूली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, गणेश पाटील, नितीन सोनवणे, मुकेश पाटील, उज्वल मस्के, राहूल नारेकर, सुभाष घोडेस्वार तसेच नगरपालिका कर्मचारी निलेश चौधरी व झुंबर पाटील आदी सहभागी होते. नगरपालिका व पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे कोरोना आटोक्यात राहणार अशी चर्चा आता रंगु लागली आहे.