फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संचारबंदीत काही काळ शिथीलता देण्यात आलेला आहे. मात्र यानंतर विनाकारण घराच्या बाहेर फिरणार्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिला आहे.
प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सांगितले की, नागरिक कोरोना विषाणूचे गांभीर्य घेत नाही.स्वतःची काळजी सुद्धा नागरिक करीत नसून बिनधास्तपणे गावात फिरत आहे. आजपासून यावल, फैजपूर व रावेर या भागातील नागरिक व टवाळखोर रस्त्यावर दिसले तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असे सूचना पोलीस स्टेशनला देण्यात आले आहेत. तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी पालिका कर्मचारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करायचे.किराणा व दुध घेण्यासाठी नागरिकांनी चार चाकी व दुचाकीचा वापर करू नये पायदळच किराणा व दुध घेण्यासाठी जावे.
दरम्यान, किराणा दुकान, दूध, औषधी आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद न करता २४ तास सुरू राहतील तसेच संबंधित व्यावसायिकांनी स्वतःची व ग्राहकांची घेणे आवश्यक आहे.दोन ग्राहकांमधील अनंत निर्जंतुकीकरण व स्वच्छता शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.