धरणगाव, प्रतिनिधी । महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयात कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या योद्धे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यात शिवसेना गटनेते विनय भावे ( पप्पू भावे) यांना देखील गौरविण्यात आले.
धरणगाव येथील वार्ड क्र.४ चे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विनय भावे ( पप्पू भावे)यांना कोरोना योद्ध म्हणून तहसील कार्यलयात सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. भावे यांचे तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे. शिवसेनेचे नगरसेवक, आदी उपस्थित होते.