पटना (वृत्तसंस्था)आयपीएस विनय तिवारी यांना अद्यापही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे, असे बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकऱणी त्याचे वडील के के सिंह यांनी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केल्याने विनय तिवारी तपासासाठी बिहारमधून मुंबईत दाखल झाले होते. पण मुंबईत पोहोतचात त्यांनी क्वारंटाइन करण्यात आले. तिवारी यांना अद्यापही होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याने बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. आम्ही अजून एक दिवस वाट पाहू आणि त्यानंतर मुंबई पोलिसांविरोधात कारवाई करु. आम्ही यासंबंधी बिहार सरकारकडून सल्ला घेत असून न्यायालयात जाण्याचा मार्गही निवडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.