मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२० च्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याचे छापण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक बघता महाराष्ट्रात ठाकरे सरकार येऊन दोन महिने होत आले आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री दाखवण्यात आले आहे. जानेवारी २०२० चे कॅलेंडर आहे मात्र त्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हरिभाऊ बागडे यांचा तर राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दाखवण्यात आले आहे. दरम्यान, या कॅलेंडरवरून नौकरशीहीचा बेजाबदारपणा उघड झाला आहे.