मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीसह भाजपने धुळे नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातील पोटनिवडणूकीसाठी अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी ३० मार्चला पोटनिवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून ३१ मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हे आहेत. परंतू महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.