
बीड (वृत्तसंस्था) संख्याबळ नसल्यामुळे भाजपने विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे संजय दौंड यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. येत्या 24 जानेवारीची निवडणुक ही फक्त औपचारिकता म्हणून घेतली जाईल.
राष्ट्रवादीचे नेते सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी बीड विधानपरिषदेसाठी पोटनिवडणुक होत आहे. भाजपकडून राजन तेली यांनी अर्ज दाखल केला होता. पण, संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संजय दौंड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत. पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.