जळगाव प्रतिनिधी । महावितरण तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत नशिराबाद शिवारातील दादरचे उभे पीक जळून खाक होवून ४० हजार रूपये किंमतीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील कोकीळा निवृत्ती नेहती (वय-४९) रा. द्वारका नगर यांचे नशिराबाद शिवारात शेतगट नंर १५९ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी दादरचे पिक घेतले आहे. दरम्यान २ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरणच्या तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील दादरचे उभे पिक जळून सुमारे ४० हजार रूपये किंमतीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोकीळा नेहती याच्या खबरीवरून नाशिराबाद पोलीसात अकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण बाविस्कर करीत आहे.