एरंडोल प्रतिनिधी । विद्युत आकारणी बिले माफ करा अशी मागणी तालुका भाजपातर्फे उपविभागीय अभियंता महाराष्ट्र राज्य महा विद्युत वितरण कंपनी यांना निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलानाचा इशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकांना कामधंदा नाही आहे. लोकांवर आर्थिक संकट आलेले असून आज लोकांना जगण्याशिवाय पर्याय राहिला नाही आहे. त्यात वीज वितरण कंपनीने कोणत्या प्रकारचे मिटर रिडिंग न घेता अव्वाच्या सव्वा अंदाजे वीजबिल अकारलेले आहेत. लोक ही विजबिलाची रक्कम भरु शकत नसल्याने सदर वीजबिल माफ करावे असे म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेतातील ट्रान्सफॉर्मर जळल्यवर त्यांना वेळेवर ते मिळत नाही व त्याउलट शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याची सक्ती केली जात असल्याचे देखील म्हटले आहे. तरी अशा लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी सदर मागण्या मान्य न झाल्यास जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे व यासाठी आपण जबाबदार राहाल अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनावर नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस अमोल जाधव, माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, माजी संगायो सभापती सुनिल पाटील, संजय साळी, तालुका उपाध्यक्ष वाल्मिक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.