यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज,प्रतिनिधी | तालुक्यातील गाव जंगलामध्ये होत असलेल्या शेती विद्युत तार चोरी तसेच विहिरीतील (ताब्याची तार) केबल चोरीच्या घटना वारंवार होत असून रात्रीची गस्त करून या घटनांना आळा घालावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष नारायण शशीकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, गेल्या १ ते २ महिन्यान पासून तालुक्यातील गावामध्ये शेती शिवारात बऱ्याच प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हा खूप वाईट प्रसंगातून जात आहे. सदरील चोऱ्यांमध्ये शेत शिवारात असलेल्या विद्युत ताराची चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे ह्या चोरी मध्ये चोर १२/१५/२० पोलामधील तार चोरीला नेत आहे. सदरील चोरी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे कि शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला दिसत आहे. तसेच बऱ्याच विहारींमध्ये असलेल्या केबलची ( तांब्याची तार ) चोरीचे प्रमाण हि भरपूर वाढलेले आहेत. सदरील केबल ची एका विहिरीस लावण्याच्या केबलची किंमत हि अंदाजे दहा हजार असून अश्या एका रात्रीत १०/१५ विहिरीतील केबल चोरी होत आहेत. म्हणजे सदरील चोरीमध्ये चोर हे एका रात्रीत लाखोंची चोरी करत आहेत. शेतकरी हतबल होऊन रडतांना दिसतोय. हे चोरी सत्र जर अशेच चालू राहिले तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. आता तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त पोलीस प्रशासनावरच विश्वास आहे कारण राज्यसरकारने तर गोड बोलून बोलून फक्त कर्जमाफीची व वीजबिल माफीची आश्वासन दिलीत व आता आता दोघी बाजूंनी सक्तेची वसुली सुरु केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनावर तालुका अध्यक्ष सागर महाजन, उमेश हेगडे सभापती पल्लवी चौधरी, शरद महाजन, तालुका सरचिटणीस हर्षल पाटील, विकास चौधरी, सविता भालेराव, मार्केट कमिटी उपाध्यक्ष उमेश पाटील, तालुका सरचिटणीस विजयसिंग राजपूत, पंचायत समिती गटनेते दीपक पाटील, मार्केट कमिटी उपसभापती राकेश फेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपा शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, पुरुजित चौधरी, गोपाल पाटील, योगराज बऱ्हाटे, सचिन तडवी, पुंडलिक कोळी, पवन कोळी, गोपाल कोळी, जयेश चौधरी आदींची स्वाक्षरी आहे.