Home Cities जळगाव विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

0
32

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील एनमुक्टोच्या पदाधिका-यांनी संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली कुलगुरु डॉ.पी.पी. पाटील यांचेसोबत भेट घेत निवेदन दिले. अॉनलाईन अध्ययन- अध्यापन, अॉनलाईन परिक्षा अर्ज भरणे व अॉनलाईन परिक्षासंदर्भात विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना येणा-या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.

कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, कुलसचिव डॉ. बी.व्ही. पवार, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक भेटीमध्ये त्यांनी आश्वासन देत काही निर्णय घेतले. यात प्रामुख्याने, परिक्षा अर्ज भरण्याची तारिख वाढवुन ६ डिसेंबर करण्यात आली. तसेच ९ डिसेंबरपर्यंत विलंब फी सह अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याचे निश्चित झाले. २०२०-२१ या शैक्षणीक वर्षात द्वितीय व तृतीय वर्गांमध्ये प्रवेशीत नियमीत विद्यार्थ्यांची तृतीय व पाचव्या सत्राची परिक्षा हि जानेवारी २०२१ मध्ये घेण्याचे ठरले. परिक्षा अर्जातील होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही असेही आश्वासीत केले. कोविड काळातील होणाऱ्या सर्वच परिक्षांबाबत निर्माण होणाऱ्या अडचणींतुन वेळोवेळी मार्ग काढण्यासाठी एनमुक्टो संघटनेसोबत संवाद कायम ठेवण्याचे आश्वासीत केले.

कोविड काळात ज्या प्राध्यापकांनी विद्यापीठाचे आदेश पाळुन वेळेत सर्व सोपविलेल्या जवाबदाऱ्या पुर्ण केलेल्या आहेत अशा प्राध्यापकांना “कोरोना योध्दा” च्या धर्तीवर विशेष प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्याचे ठरले.
तसेच विद्यापिठीय व महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रखडलेल्या पदोन्नतींसाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासीत केले. प्राध्यापकांना पदोन्नतीवेळी मागीतल्या जाणाऱ्या जाचक अशा ‘समकक्षता प्रमाणपत्राची’ अट शिथिल करण्याचा प्रस्ताव अकॅडमीक काऊंन्सीलच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासीत केले. धरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे भ्रष्ट कारभाराबाबत कार्यवाही त्वरित केली जाईल असेही कुलगुरु डॉ.पाटील यांनी आश्वासन दिले.

विद्यार्थी व प्राध्यापकांच्या विविध समस्यांसंदर्भात एनमुक्टोचे अध्यक्ष डॉ.अनील पाटील, उपाध्यक्ष डॉ. ई.जी.नेहते, सचिव डॉ. जितेंद्र तलवारे, सहसचिव डॉ.प्रकाश लोहार, खजीनदार डॉ. किशोर कोल्हे यांनी सविस्तर मांडणी केली. सदर बैठकीस एनमुक्टो जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन बावीस्कर व डॉ.प्रविण बोरसे उपस्थीत होते.


Protected Content

Play sound