धरणगाव, प्रतिनिधी । येथील इंदिरा गांधी विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लॉकडाऊन असतांना देखील सीमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रमात अखंडता राखली हे विशेष! उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे
ऑनलाइन शिक्षणासाठी सर्व वर्ग शिक्षकांचे ग्रुप तयार आहेत. इ १० चे वर्ग शिक्षक एन. बी. पाटील यांनी ग्रुपद्वारे वर्गातील विद्यर्थिनींना राख्या बनविण्याचे मार्गदर्शन केले व राख्या पाठविण्याचे आवाहन केले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळून विद्यार्थिनींनी स्वहस्ताने तयार केलेल्या राख्या शाळेत पोहोच केल्या. यात तिरंगा राख्या खूप छान दिसत होत्या. राख्या लोकरीचा धाग्याने तयार केल्या होत्या. त्या सॅनीटराईज करून सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या उपक्रमातून सैनिक बांधवांप्रती स्नेहयुक्त भाव दर्शविण्यात आला आहे. हा र उपक्रम शाळेचे माजी शिक्षक राजेंद्र पडोळ यांनी सुरू केला असून एन. बी. पाटील यांनी यात अखंडता ठेवली आहे. लॉकडाऊन स्थिती असतांना सुदधा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील,सचिव सी. के. पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील,पर्यवेक्षक ए. एस. पाटील यांनी विद्यार्थिनींचे व उपक्रमशील शिक्षकाचे कौतुक केले आहे. यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.