जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ द्वारे कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खा. सुळे यांनी आश्वासन दिले.
गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विद्यापीठ लेखणी व अवजार बंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचा पाठींबा दिला आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी कमगारांशी भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर अभिषेक पाटील यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली तर सुळे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी येत्या बुधवारी मुंबई येथे विद्यापीठीय कर्मचाऱ्यांनी येवून कर्मचाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेश आयोजित असल्याचे सांगत, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव शहर जिल्हाध्यक्षक अभिषेक पाटील, सचिव कुणाल पवार, युवक जिल्हाध्यक्षक स्वप्निल नेमाडे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे समन्वयक रमेश शिंदे, दुर्योधन साळुंखे, अरूण सपकाळे, राजू सोनवणे यांच्यासह आंदोलन करणारे कर्मचारी उपस्थित होते.