जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते ‘बौध्द तत्त्वज्ञान आणि भारतीय उच्च शिक्षणप्रणाली’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विद्यापीठात सपन्न झाला.
बौध्द तत्त्वज्ञानाचा आधुनिक काळात उपयुक्त जीवनविषयक मूल्ये आणि संस्कृतीचे संवर्धनातून मानवी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी बौध्द तत्त्वज्ञान उपयुक्त आहे. आधुनिक उच्च शिक्षण प्रणालीस बौध्द तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर आधरित अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्मिती करण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्राध्यापक, शिक्षक, अभ्यासक तज्ज्ञ आणि संशोधक विद्यार्थी यांच्याकडून शोधनिबंध वा लेख मागविण्यात आले, त्यातूनच ‘बौध्द तत्त्वज्ञान आणि भारतीय उच्च शिक्षणप्रणाली’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. पुस्तकांत बौध्द तत्त्वज्ञान आणि भारतीय उच्च शिक्षणप्रणाली या विषयावर अभ्यासपूर्ण पध्दतीने लिहलेल्या एकुण २९ लेखाचा समावेश आहे. बौध्द तत्त्वज्ञान आणि उच्च शिक्षण, तथागत गौतम बुध्द एक आदर्श शिक्षक, बौध्द तत्त्वज्ञानातील मानवतावादी मूल्यशिक्षण या काही प्रमुख विषयावरील अभ्यासपूर्ण विवेचन पुस्तकात करण्यात आले आहे. पुस्तकाचे संपादन कार्य डॉ. संतोष खिराडे आणि विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रो. अनिल डोंगरे यांनी केलेले आहे. सुन्यती इंटरनॅशनल फाउंडेशन नागपूरचे संचालक मंगेश दहिवले यांची प्रस्तावाना सदर पुस्तकास लाभली आहे. हे पुस्तक उच्च शिक्षणातील संशोधक व अभ्यासकाना उपयुक्त आहे. याप्रसंगी प्रशांत पब्लिकेशचे प्रकाशक रंगराव पाटील, प्रदिप पाटील, प्रा. जगतराव धनगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.