जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे पाच दिवशीय जेष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटनला प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन हे ऑनलाईन उपस्थित होते. तर तहसीलदार जितेंद्र कुवर, प्र-कुलगुरू बी. व्ही. पवार, जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. मनीष जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. मनीष जोशी, यांनी प्रास्ताविकात जेष्ठ नागरिकांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना मदत करत यावी हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. तर तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनाची माहिती देत या योजनांची माहिती गरजूं जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य जेष्ठ नागरिक सहाय्यता दूतांनी करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. यासाठी आपण सर्वतोपरी मदती करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. प्र-कुलगुरू बी. व्ही. पवार यांनी पाच दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात घेण्यात येणाऱ्या विविध सत्रांची माहिती दिली. यात जेष्ठ नागरिक सहाय्यता दूतास रक्तदाब तपासणी, रक्त संकलन, प्रथमोपचार आदींसह प्रशिक्षणार्थच्या व्यक्तिमत्वाचा विकास देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/210462594379485