Home Cities जळगाव विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम

विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम

0
37

जळगाव‍, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने सोमवार दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झूमअॅपद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन राहतील. सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सहायक प्रा.डॉ.लिना चौधरी, योगशिक्षक गौरव जोशी हे योगाचे प्रात्यक्षिक सादर करतील. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती समन्वयक इंजि.राजेश पाटील यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound