जळगाव (प्रतिनीधी)। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश धनगर यास शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विविध पुरस्कार प्राप्त झाल्याने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कला,क्रिडा व सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल व कोविड-१९ या संसंर्गजन्य आजारात कोविड योध्दा म्हणून कार्यरत असलेला विद्यापीठ समाजकार्य विभागाचा विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक असलेला व विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा आकाश धनगर यास विविध संस्थाच्या वतीने पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्र-कुलगुरू पी.पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, संचालक बी.पी.पाटील,प्रा. अर्चना देगावकर, प्रा.डॉ. मनीष आर. जोशी, डॉ. पंकज नन्नवरे यांनी अभिनंदन केले.