Home Cities जळगाव विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्सवर्कचा कार्यक्रम जाहीर

विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्सवर्कचा कार्यक्रम जाहीर


जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पेट-२०१९ मधील नोंदणीकृत तात्पुरत्या प्रवेशित संसोधक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्री-पीएच.डी. कोर्सवर्क चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्री-पीएच.डी. कोर्स वर्कचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संबधित विषयांच्या अभ्यासक्रम व अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी ही माहिती घेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन कोर्सवर्कला उपस्थिती नोंदवून कोर्सवर्क पूर्ण करावा. कोर्सवर्क पूर्ण केल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाकडून प्रसिध्द केले जाईल. यापूर्वीचे पेट-२०१४ व पेट-२०१७ मधील तात्पुरता नोंदणीकृत संशोधक विद्यार्थी जो प्री-पीएच.डी. कोर्सवर्क पेपर-१ अनुत्तीर्ण आहे किंवा ज्यांनी कोर्सवर्क पूर्ण केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी देखील हा कोर्सवर्क पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अशी माहिती संशोधन विभागाच्या वतीने सहायक कुलसचिव व्ही.व्ही. तळेले यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound