विट व्यावसायिक कुंभार समाजाला ऑनलाईन प्रणालीतून वगळा : शिवसेनेची मागणी

यावल, प्रतिनिधी | ऑनलाइन महा खनिज संगणकीय कार्यप्रणालीमधून वंशपरंपरागत वीट व्यावसायिक असलेल्या कुंभार समाजाला वगळण्यात यावे अशी मागणी येथील शिवसेनेच्या शहर शाखेने तहसीलदार महेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, शासन निर्णयानुसार , वंशपरंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाला ५०० ब्रास माती स्वामित्व धनातून वगळण्यात आले. हा समाज वर्षातून सहा महिने अल्पावधीचा विट व्यवसाय करीत असल्याने वीट व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर करार पद्धतीने जागा घ्यावी लागते. हा समाज मागासलेला असल्याने तसेच अल्पशिक्षित असल्याने व ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळत नसल्याने शासनाने ऑनलाइन महा खनिज संगणकीय कार्यप्रणाली मधून या व्यवसायाला वगळण्यात यावे. ५०० ब्रास माती परवाना पत्रकाद्वारे देण्यात यावे. तसेच महा खनिज ॲप कार्यप्रणालीनुसार १६ रुपये ५२ पैसे प्रति ब्रास प्रमाणे चार्ज आकारण्यात येतो. ५०० ब्रासचे आठ हजार २६० रुपये होत असताना सर्व खर्चासह दहा हजार रुपये पडत असल्याने गरीब व्यावसायिकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी कुंभार समाजास तहसीलदार स्तरावर फ्री पासचे परमीट मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर शहर प्रमुख जगदीश कवडी, वाले सागर देवांग, पप्पू जोशी यांच्या सह्या आहेत.

Protected Content