जळगाव प्रतिनिधी । रविवारी मध्यरात्री तालुक्यातील विटनेर येथील एक डॉक्टर दाम्पत्य पॉझिटीव्ह आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता ४५२ वर पोहचली आहे.
दोघं डॉक्टरांची तपासणी अहवाल खासगी लॅबकडून प्राप्त झाला असून म्हसावद आरोग्य केंद्राच्या पथकाने त्यांच्या संपर्कातील दोघा मुलांना क्वारंटाईन केले आहे. गावात तातडीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. भुसावळच्या शांतीनगरानंतर नशिराबाद, भोकर आणि आता विटनेरच्या डॉक्टर दाम्पत्य कोरोना बाधित झाले आहेत. त्यांचे अनुक्रमे वय ५८ व ४८ आहे. सदर डॉक्टर दाम्पत्य जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४५० झाली असून पाचशेकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या पन्नाशी पार केली आहे. तर रूग्णालयात सध्या २०७ रूग्ण उपचार घेत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.