पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बहादरपूर येथील रा.का. मिश्र विद्यामंदिरात विज्ञान छंद मंडळातर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात डॉ.अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून ते थेट राष्ट्रपती मिसाईल मॅन अशा अनेक घटकांवर प्रकाश टाकण्यात आला.
सर्वप्रथम डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व विज्ञान शिक्षकांनी केले नंतर डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन पटलांवर विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस. बी. चौधरी सर यांनी संपूर्ण डॉ.अब्दुल कलाम यांचे अनेक उदाहरणे देऊन, विद्यार्थ्यांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून सादर केले.
यामध्ये डॉ.अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून ते थेट राष्ट्रपती मिसाईल मॅन अशा अनेक घटकांवर प्रकाश टाकून आपले मनोगत स्पष्ट केले व विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या बुरसट प्रवृत्तीला आळा घालून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासता येईल हे स्पष्ट केले नंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता हे सुद्धा डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वावरून स्पष्टीकरण केले गेले तसेच इन्स्पायर अवार्ड याविषयी सखोल अशी माहिती देऊन विद्यार्थ्यांना या अवार्ड मध्ये कसा सहभाग नोंदवता येईल याविषयी माहिती स्पष्ट केली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. पी. बडगुजर यांनी केले तर गोड आभार प्रदर्शनाचे कार्य विद्यालयाच्या ज्येष्ठ विज्ञान प्राध्यापिका अमृतफळे मॅडम यांनी केले, सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू भगिनी व सर्व विज्ञान छंद मंडळात सहभागी असलेले विद्यार्थी हजर होते.