विजेच्या धक्क्याने महिला जागीच ठार; एमआयडीसी पोलिसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बिलाल चौक येथील 50 वर्षीय महिलेला विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आजदुपारी  तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

जिन्नताबी हुसेन शेख ( वय 50 रा. बीलाल चौक, मदरसा गल्ली, तंबापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, जिन्नताबी हुसेन शेख ह्या आज 20 जुलै रोजी दुपारी कपडे सुकवण्यासाठी अंगणात आल्या  होत्या.  अंगणात वीजेची तार खड्ड्यात पडली होती.  यावेळी त्यांच्या पाय त्या खड्ड्यातील पाण्यात पडल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

Protected Content