Home क्राईम विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी रोडवर डिपीजवळ विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, दत्तात्रय आत्माराम पाटील (वय-४६) रा. बिडगाव ता. चोपडा हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. ११ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दत्तात्रय पाटील हे चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंड्यापाणी रोडवर असलेल्या डीपीजवळ सिंगल फेज वर तार हातात घेऊन फेरफार करून जम्पिंग करत असताना त्याला विजेचा धक्का लागला. या विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयदीप राजपूत करत आहे.


Previous articleतिक्ष्ण हत्यारासह एकाला अटक
Next articleऑनलाईन वीजबिल भरण्यास प्रतिसाद
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound