जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने भीमा कोरेगाव लढाईच्या २०५ व्या विजय शौर्य दिनानिमित्त रविवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली.
भीमा कोरेगाव लढाईच्या २०५ व्या विजय शौर्य दिनानिमित्त जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यान बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी काढलेल्या मशाल रॅलीमध्ये विविध शौर्य दाखवणारे खेळांचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर जळगाव रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रबोधन व भीम गीतांचा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होती