विकास दुबे बदमाश होता, पण पोलीस त्याच्याहून अधिक बदमाश निघाली : प्रकाश आंबेडकर

मुंबई (वृत्तसंस्था) विकास दुबे बदमाश होता, पण पोलीस त्याच्याहून अधिक बदमाश निघाली, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

कुविख्यात गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरवर विविध राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्हं निर्माण केलेले असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विकास दुबे हा बदमाश होता. पण पोलीस त्याच्यापेक्षाही अधिक बदमाश निघाले. दुबेच्या अटकेमुळे अनेकांची नावं उघड झाली असती. त्यांचे काळेधंदेही बाहेर आले असते. आता या एन्काऊंटरमुळे ती लिंकही संपुष्टात आली आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Protected Content