वाहनांच्या कागदपत्र नूतनीकरणाला मुदतवाढ

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा मूदतवाढ दिली आहे. देशातील अनेक वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

 

ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, प्रदूषणमुक्त  किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

 

गेल्या वर्षी  लॉकडाउन लागल्यापासून मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने अनेकदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाने ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पीयूसी यांच्या नूतनीकरणाची चिंता भेडसावणाऱ्या अनेक वाहनधारकांना  दिलासा मिळाला आहे.

Protected Content