जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा येथे मध्यरात्री गच्चीवर कुटुंब झोपलेले असतांना २ अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून चोरी करतांना दिसून आले. घरमालकाला झटका देवून चोरटे पसार झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा येथे भाऊसाहेब चिंतामण पाटील हे आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. उन्हाळा असल्याने नेहमीप्रमाणे ते कुटुंबासह घराच्या गच्चीवर झोपले होते. शुक्रवारी २ जुन रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दोन चोरटे आले. त्यांनी जिन्याचा दरवाजा लावून बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले १० हजार रूपये काढले. दरम्यान, भाऊसाहेब यांना जाग असल्याने खालती उतरून घराचा मुख्य दरवाजा बाहेरून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू दोन्ही चोरट्यांनी दरवाजाला झटका देवून भाऊसाहेब पाटील यांचा झटका देवून पसार झाले. याबाबत पोलीस पाटील विनोद गोपाळ यांनी पाहणी केली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.