नवी दिल्ली । वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना सक्षम असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर, एएनआयला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ”जरी आम्ही सरकामध्ये असलो तर या वक्तव्याचा उचित समाचार घेण्यास शिवसेना समर्थ आहे.” याचबरोबर त्यांनी असुदद्दीन ओवैसी यांच्या पाकिस्तान समर्थनात दिलेल्या वक्तव्यापासून हात झटकण्यावरही टीका केली. ते म्हणाले, ”हा विषय एखाद्या नार्यापासून हात झटकण्याचा नाही. तुमच्याच व्यासपीठावर येऊन एक महिला नारा देते याचा अर्थ तुम्ही हा नारा देण्यास पोषक वातावरण निर्मिती केली” असा आरोप राऊत यांनी केला आहे.