वारकर्‍यांवरील हल्ल्याचा डॉ. जगदीश पाटील यांनी केला निषेध

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल आळंदी येथे वारकर्‍यांवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याचा कॉंग्रेस नेते डॉ. जगदीश पाटील यांनी निषेध केला आहे.

 

डॉ. जगदीश पाटील यांनी एक निवेदन जारी करून वारकर्‍यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, काल आळंदी येथे माऊली पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळेस झालेला अतिरेक हा फडणवीस सरकारचा एक प्रकारचा हुकूमशाही पद्धतीचा वापर दिसून आला. कालचा सोहळा ज्या वेळेस आळंदी येथून माऊलींची पालखी प्रस्थान होते त्यावेळेस परंपरेनुसार स्थानिक वारकरी संप्रदायातील महंत आणि संस्थांचे पदाधिकारी यांचा पादुका दर्शनाचा मान असतो. त्यामध्ये ७० ते ८० लोकांना दरवर्षी पालखीचा मान दिला जातो परंतु धार्मिक भावने पोटी पालखी सोहळा निघत असताना अति प्रमाणामध्ये वारकरी व भक्तगण जमा झालेले होते पादुका बाहेर निघत असताना विधिवत पूजा झाल्यानंतर बाहेर येत असताना वारकरी व भक्त आपण सुद्धा या सोहळ्यात सहभागी झालं पाहिजे असे वाटल्याने त्यामध्ये पुन्हा मुंबई नाशिक व उर्वरित महाराष्ट्रातून आलेले भाविक यांनी त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्या वारकर्‍यांना रोखण्याचा पोलिसांनी जो प्रयत्न केला तो चुकीचा होता.

 

डॉ. जगदीश पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, जर समोपचाराने भाविक भक्तांची वारकर्‍यांची पोलिसांनी पोलीस अधिकार्‍यांनी सामंजस्य भूमिका घेऊन एकेकाला दर्शनाची संधी दिली असती तर कालचा हा प्रकार घडला नसता. हा प्रकार घडवण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्य हेतू आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या काही माणसांनी यांच्यावर भाजपच्या सरकारवर मागच्या वेळेस गंभीर आरोप केलेले होते. त्याचा राग मनात ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी हेतू पुरस्कार हे घडवून आणण्यासाठी शासनास प्रशासनास एक प्रकारे अधिकार दिले होते असे जाणवते.

 

आम्ही मुक्ताईनगर येथून ज्ञानेश्वराची बहीण आई मुक्ताई संस्थांच्या पालखी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरासाठी जात असलेल्या मुक्ताईच्या रथाला पालखीला निरोप देत असताना प्रस्थान करत असताना सहभागी होत असतात. परंतु हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी उपस्थित असून कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त तिथे अतिरेक करत नाही सहकार्याची भावना सेवेची भावना पोलीस प्रशासनाच्या अंगी दिसून येते परंतु देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना दंडेलशाही,हुकूमशाही,दडपशाही करून हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायावर एक प्रकारचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री हे करत आहेत. मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेस कमिटी व आई मुक्ताई चे भाविक व वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी ह्या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. अशा घटना अतिरेकी प्रकार कदापिही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपतीशाहू महाराज, महात्मा ज्योतिबा  फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यात असेल प्रकार खपून घेतले जाणार नाही असा इशारा डॉ. जगदीश पाटील यांनी दिला आहे.

Protected Content