हुनाई: ( व्हिएतनाम ) : वृत्तसंस्था । वापरलेले कंडोम धुऊन पुन्हा विकणाऱ्यांना व्हिएतनाममधील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एका गोदामात ठेवलेले सुमारे तीन लाख २४ हजार वापरलेले कंडोम जप्त केले आहेत.
व्हिएतनाममधील दक्षिण प्रातांतील बिन्ह दुओंगमधील एका गोदामात वापरेले कंडोम असलेल्या जवळपास १२ गोण्या आढळल्या. या गोण्यांचे वजन जवळपास ३६० किलो होते. या गोदामाच्या मालकाने सांगितले की, आरोपींना एका अज्ञात व्यक्तींकडून त्यांना दर महिन्याला वापरेल्या कंडोमची बॅग मिळत होती.

पोलिसांनी या छाप्यात एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. या महिलेने सांगितले की, वापरलेले कंडोम उकळत्या पाण्यात टाकले जायचे. त्यानंतर त्यांना सुकवले जायचे. महिलेने सांगितले की, या सुकवलेल्या कंडोमला लाकडी लिंगाच्या आधारे पुन्हा आकार दिला जात होता. त्यानंतर कंडोमची पॅकेजिंग करून त्यांची विक्री केली जात होती.


