Home Cities रावेर वादळात नुकसान झालेल्या केळीची तहसीलदारांकडून पाहणी

वादळात नुकसान झालेल्या केळीची तहसीलदारांकडून पाहणी


रावेर प्रतिनिधी । मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या केळीच्या पिकांच्या नुकसानीची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना मंडळाधिकाऱ्यांना दिले.

रावेर परीसरातील पूर्व भागात काल मंगळवारी वादळी पावसामुळे काही प्रमाणात केळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये निरूळ, पाडळे, अहिरवाडी येथील काही गट नंबर मधील केळीचे नुकसान झाले आहे. याची माहीती मिळताच आज बुधवारी सकाळी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सदर नुकसानीची पाहणी केली व नुकसान बाबत प्राथमिक अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्या कडून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound