वाचन संस्कृती रुजवणे सामाजिक कर्तव्य : प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे

यावल,  प्रतिनिधी | राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी भिंती बाहेरील शिक्षण स्वतःसाठी नव्हे तर दूसर्‍यासाठी जगणे रासेयो शिकवते तसेच आधुनिकते बरोबर वाचन करणे महत्वाचे आहे.  सामाजिक उपक्रम राबवताना समाजात वाचन संस्कृती रुजवणे हे सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी बोरावल येथे ‘कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा’ चे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात केले.

 

कार्यक्रमात कोरोनाला रोखायचे असेल तर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. लस विषयी  मनात कोणताही गैरसमज ठेवू नये. आपला निर्धार हा कोरोना मुक्त गाव असावे असे आवाहन केले.   येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एककाचे एक दिवशीय शिबिर दत्तक गाव बोरावल येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घेण्यात आले.

‘राष्ट्रीय सेवा योजना’ स्थापना दिन व ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव वर्धापन दिनाचे’ औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी वाचनकट्टा चे उद्घाटन बोरावल खुर्दचे सरपंच सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून विविध उपक्रमात सहभाग घेऊन सुप्तगुणांना वाव मिळतो, असे उद्घाटक सुनील पाटील यांनी सांगितले.  याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार व उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हुसैन तडवी, प्रा. एस. आर. गायकवाड, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, शिक्षक सी. एल. मनोरे, वाल्मीक पाटील, राजेश महाजन, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर कोरोना लसीकरण विषयी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. तसेच कोरोना विषयी जनजागृतीबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन स्वयंसेवकांनी केले.  प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. डी. पवार यांनी मानले. यशस्वितेसाठी महाविद्यालयीन कर्मचारी शालिक साळुंखे, साहेबराव अहिरे, प्रमोद जोहरे तसेच स्वयंसेवक निखिल धनगर, जीवन कोळी, मोहित बाविस्कर, हेमंत भालेराव, निलेश भोईटे, हेमांशू नेवे, गायत्री जावळे, युक्ती चौधरी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content