सावदा , ता रावेर ; प्रतिनिधी । वाघोदा बु.येथील लोकनियुक्त सरपंच मुकेश तायडे अपात्र असल्याचा ठपका ठेवत त्यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे निवडून आल्यावर त्यांनी मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनि हा निर्णय जारी केला
लोकनियुक्त सरपंच मुकेश तायडे यांना अपात्र ठरवावे असा दावा करणारा विवाद अर्ज क्र . 26 /2020 ग्रामपंचायत सदस्य मुबारक अली तडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे 10 ( 1 अ ) अन्वये 9 मार्चरोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जारी केला आहे वाघोदा ग्रामपंचायतीच्या सन 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुकेश तायडे अनु.जमाती आरक्षणातून सरपंच निवडून आले होते निकाल घोषित झाल्यापासुन एक वर्ष मुदतीच्या आत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने तडवी यांनी 1 जानेवारी , 2020 रोजी तक्रार दाखल केली होती या तक्रारींवर निर्णय घेण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रावेरच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते तहसिलदार यांनी चौकशीचा अहवाल ४ डिसेंबर , २०२० रोजी सादर केला होता
. आपण टोकरे कोळी जातीचे आहोत असा दावा प्रतिवादी लोकनियुक्त सरपंच मुकेश तायडे यांनी केला होता . प्रतिवादी सरपंच चौकशीची नोटीस मिळुन देखील दंडाधिकारी न्यायालयात गैरहजर होते वेळोवेळी संधी देवून सुध्दा त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही .
हा निर्णय जारी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सो . लि . पिटीशन मधील सि.ए.न. 29874-29875 / 2016 आणि उच्च न्यायालयांच्या औरंगाबाद खंडपीठातल्या रिट याचिका नं . 5686/2016 मधील निर्णयांचा आधार घेतला आहे
निवडणुक आयोगाच्या क्र.रानिआ / मनपा -2015 / प्र.क्र .1 / का -5 दि .16 / 12 / 2016 च्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याने विहित मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा सदस्याची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द ठरवली जाते रावेरचे तहसिलदार यांनी 6 मार्च , 2020 रोजी सविस्तर अहवाल सादर करुन प्रतिवादी लोकनियुक्त सरपंच यांनी शासनाच्या सुधारीत अध्यादेशानुसार मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही असा स्पष्ट अहवाल दिलेला आहे .